सोमाटणेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
सोमाटणे, ता. १६ ः येथील आग्रवाल विद्या प्रसारक मंडळ संचालित गीता विद्यानिकेतन इंग्लिश मेडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेजच्या वतीने मेडिकल, इंजिनिअरिंग, जेईई, एनटीए, एनडीए, सीए आदी क्षेत्रात करिअर करणाऱ्या व याच विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला.
या मेळाव्याची सुरुवात मराठी व इंग्रजी भाषेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली. या वेळी विद्यालयाच्या वतीने जेईई परीक्षेत ९८.४४ टक्के गुण मिळवणाऱ्या आरव राजेश शेट्टी यास अॅक्टिवा भेट म्हणून देण्यात आली. मेडिकल क्षेत्रातील एमबीबीएस मध्ये शिक्षण घेत असलेले डॉ. श्वेता मित्तल, डॉ. अमिष आग्रवाल, डॉ. रितीक राठोड, डॉ. कुशल आग्रवाल, डॉ. कुंजल आग्रवाल, डॉ. कशिश गोयल आदींना सुनील आग्रवाल, सुरेंद्र आग्रवाल यांच्याहस्ते व प्राध्यापक जे. टी. आग्रवाल, गीता आग्रवाल, श्री. उदगिरे आदींच्या उपस्थित भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
PNE23T25058
Smt१६Sf१
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.