
वाकड, पुनावळे भागात अश्र्विनी जगताप यांची पदयात्रा
पिंपरी, ता. १८ : भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी वाकड व पुनावळे भागात काढलेल्या पदयात्रेला व कोपरा सभांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी वाकड आणि पुनावळे भागात पदयात्रा काढून, प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. अनेक नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय होती.
या भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोफत टँकर पुरवले. हा प्रश्न आपणाला कायमचा सोडवण्यासाठी लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा करून भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आणण्याचा प्रकल्प सुरू केला. हे काम प्रगतिपथावर आहे. या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले. या भागाचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त भाजपमध्ये असल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांनी अश्विनी जगताप यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड, संतोष लोंढे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, विनायक गायकवाड, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, प्रदेश सदस्या भारती विनोदे, विशाल कलाटे, राम वाकडकर, स्नेहा कलाटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, विक्रम कलाटे, रणजित कलाटे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः 25561