शिवरायांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा ः डॉ. भालेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांच्या विचारांचा आदर्श
घ्यायला हवा ः डॉ. भालेराव
शिवरायांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा ः डॉ. भालेराव

शिवरायांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा ः डॉ. भालेराव

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ ः ‘‘आपण शिवरायांचा वेश परिधान केल्याने शिवाजी महाराज होत नसतो, तर त्यातून त्यांच्या विचारांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, ’’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. सुधीर भालेराव यांनी केले.
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये शिवजन्माच्या पाळणा व अफझलखान वधाच्या पोवाड्यातून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. इतिहास संशोधक व शिवव्याख्याते ब. हि. चिंचवडे, डॉ. सुधीर भालेराव,
प्राचार्य विक्रम काळे व पर्यवेक्षक शशिकांत हुले यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांचा जन्मोत्सव ‘झुलवा पाळणा पाळणा, बाल शिवाजीचा’ या गीताच्या नृत्यातून विद्यार्थिनींनी सादर केला. या निमित्ताने शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत
‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे साधना भालेराव व विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाचा पोवाडा सादर केला. रवीना खरात , अथर्व काकडे यांनी आपल्या भाषणातून व गीतातून शिवरायांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडला. याप्रसंगी शिवरायांची वेशभूषा सक्षम लोखंडे तर जिजाऊंच्या वेशभूषा रवीना खरात यांनी केली होती. रामनाथ खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. गजानन हरिदास यांनी आभार मानले.
फोटो ः 25562