
समरसताच्या पथनाट्य स्पर्धेत आंबेकर आणि ‘डीवाय’ प्रथम
पिंपरी, ता. १९ ः समरसता साहित्य परिषदेच्या बाराव्या विद्यार्थी समरसता साहित्य संमेलनात आयोजित पथनाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठी मॉडर्न महाविद्यालय निगडीच्या प्रा. नूतन आंबेकर, सांघिक पथनाट्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आणि निबंध लेखन स्पर्धेत मॉडर्न महाविद्यालयाची सानिका गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
काळभोरनगर येथील प्रतिभा महाविद्यालयात संमेलन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास प्रमुख प्रा. डॉ. एस. एम. कांबळे, प्राचार्य डॉ. रणजित पाटील, प्रा. डॉ. धनंजय भिसे आदी उपस्थित होते. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी किरण येवलेकर यांनी केले. पथनाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनासाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील नीरज पाटील यांनी द्वितीय आणि रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रा. नवनीत हजारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक अभिनयासाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या पूनम रणपिसे (द्वितीय) आणि मॉडर्न महाविद्यालयाच्या शुभम शिंदे (तृतीय); सांघिक पथनाट्यासाठी मॉडर्न महाविद्यालय (द्वितीय), महात्मा फुले महाविद्यालय (तृतीय); प्रश्नमंजूषा स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालय (द्वितीय), मॉडर्न महाविद्यालय (तृतीय); निबंध लेखन स्पर्धेत आबासाहेब चिंचवडे महाविद्यालय संजय बजळकर (द्वितीय), मॉडर्न महाविद्यालय स्नेहल उंबरदंड (तृतीय), डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरीतील स्नेहा आढळराव आणि ताथवडेतील अनिकेत सुतार (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिक पटकावले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले. विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा आढळराव, नीरज पाटील, नयन गोवंडे, गौरव पाठक यांनी योगदान दिले. कैलास भैरट, सुहास घुमरे, मानसी चिटणीस, नीलेश शेंबेकर, जयश्री श्रीखंडे, समृद्धी सुर्वे, सुप्रिया लिमये यांनी संयोजन केले.