मोदींनी केलेल्या रस्त्यांवरून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींनी केलेल्या रस्त्यांवरून
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा

भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांचा दावा
मोदींनी केलेल्या रस्त्यांवरून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांचा दावा

मोदींनी केलेल्या रस्त्यांवरून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांचा दावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास होत आहे. जनतेला भाजपच विकास देऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या रस्त्यांवरून फिरून, भारत जोडो यात्रा करत होते, ते रस्ते मोदी यांनी तयार केले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
‘व्हिजन न्यू इंडिया’ विषयावर सूर्या यांनी रहाटणीत युवकांशी संवाद साधला. चिंचवड पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते, प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी उपस्थित होते. सूर्या म्हणाले, ‘‘अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर संपूर्ण देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर नव्या भारताचा उदय झाला. विकासकामांना गती आली आहे. देशाची आर्थिक विकासाकडे वाटचाल झाली आहे. देशभर रस्ते व विकास कामांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करणारे काम होत आहे. फक्त आठच वर्षांत संपूर्ण देश कन्स्ट्रक्शनसारखा दिसतो आहे. भाजपच देशाला विकास देऊ शकतो, असा जनतेला विश्वास आहे.’’ भाजप विकासाच्या माध्यमातून देश बांधणारा पक्ष असून, काँग्रेस विकास नष्ट करणारा पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

---
फोटो ः 25757