अश्र्विनी जगताप यांची पिंपळे गुरवमध्ये पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्र्विनी जगताप यांची
पिंपळे गुरवमध्ये पदयात्रा
अश्र्विनी जगताप यांची पिंपळे गुरवमध्ये पदयात्रा

अश्र्विनी जगताप यांची पिंपळे गुरवमध्ये पदयात्रा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच आजचे पिंपळेगुरव उभे केले. जिथे जाण्यासाठी साधा रस्ताही नव्हता, तिथे अक्षरशः विकासाची गंगा आणली. त्यांनी येथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या. असे असताना इतक्या लवकर त्यांना आणि त्यांनी केलेल्या कामाला विसरून जाऊ, एवढे कृतघ्न आम्ही निश्चितच नसल्याची भावना पिंपळे गुरवच्या नागरिकांनी सोमवारी (ता. २०) व्यक्त केली.
चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप, शिवेसना, आरपीआय (आठवले गट), शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना आणि रासप या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी त्यांचे स्वतःचे घर असलेल्या पिंपळे गुरव परिसरामध्ये पदयात्रा काढली. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन, संवाद साधला. त्यांना जागोजागी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आरपीआय (आठवले गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, नानी घुले, सागर आंगोळकर, शशिकांत कदम, सदस्य महेश जगताप, सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा आदियाल, पल्लवी जगताप, वैशाली जवळकर आदी उपस्थित होते. अश्विनी जगताप यांनी सर्व नागरिकांना हात जोडून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

अश्विनी जगताप म्हणाल्या...
- पिंपळे गुरवची सर्व जनता लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातीलच सदस्य
- पतीच्या जाण्यामुळे केवळ माझ्यावरच नाही, तर आपणा सर्वांवरच दुःखाचा प्रसंग
- त्यातून आपण सर्वजण मिळून सावरण्याचा प्रयत्न करत असताना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली
- निवडणुकीत माझ्या पतीने केलेल्या विकासाला म्हणजेच भाजपला मत द्या
फोटोः 26034