
वाल्हेकरवाडीत ९५ भक्तांचे रक्तदान
पिंपरी, ता. २१ : वाल्हेकरवाडी येथे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा रक्तदान शिबिराचे रविवार (ता. १९) रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९५ श्रद्धाळू भक्तांनी निःस्वार्थ भावनेने रक्तदान केले. यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी ९५ युनिट रक्त संकलन केले.
शिबिराचे उद्घाटन सेक्टर प्रमुख गिरधारीलाल मतनानी यांच्या शुभहस्ते झाले. या रक्तदान शिबिराला क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवानी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मागील ३६ वर्षांपासून निरंतर ही परंपरा अशीच चालू असून यामध्ये आत्तापर्यंत ७४७६ रक्तदान शिबिरे झाली आहेत. त्याद्वारे १२,३२,५१४ युनिट रक्त संकलन झाले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. तसेच, प्रमुख रामचंद्र लाड यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.