इन्फोग्राफिक -अशी आहे मतदान प्रक्रिया

इन्फोग्राफिक -अशी आहे मतदान प्रक्रिया

चिंचवड पोटनिवडणूक ः मतदार मार्गदर्शिका जाहीर

असे करा मतदान


पिंपरी, ता. २१ ः मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुविधेसाठी केंद्र शोधण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. जबाबदार मतदारांनी काळजीपूर्वक मतदान करण्यासाठी आयोगाने मतदार मार्गदर्शिका जाहीर केली आहे. ती मतदारांना उपयुक्त ठरत आहे.

मतदानासाठी मतदान कसे कराल?
- मतदानासाठी तुमचे वय किमान १८ वर्षं पूर्ण असले पाहिजे
- मतदान केंद्रात गेलात की मतदारांना एकामागे एक आत सोडले जाईल
- मतदारांचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र तसेच तत्सम कागदपत्र तपासून पाहतील
- दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर शाई लावेल
- मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल
- दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील
- तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन तुमच्या बोटाच्या नखावरील खूण तपासतात
- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ‘एमव्हीएम’च्या कंट्रोल युनिटवरील ‘बॅलेट’ बटण दाबेल
- बटण तुम्ही दाबताच यंत्रावरील लाल दिवा लागतो
- व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये तुम्हाला मतदानाची चिठ्ठी न दिल्‍यास किंवा तुम्हाला मोठ्याने बीप आवाज ऐकू न आल्यास तुम्ही मतदान केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा
- व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये चिठ्ठी सात सेंकद दिसेल आणि मुद्रित चिठ्ठी त्या यंत्रामध्ये सुरक्षित ठेवली जाईल


कोणते पुरावे सोबत ठेवावेत
- मतदार फोटो ओळखपत्र (इ-मतदान ओळखपत्र)
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- युनिक दिव्‍यांग कार्ड
- सेवा ओळखपत्र
- बॅंक किंवा टपाल पासबुक
- आरोग्य, वीमा स्मार्ट कार्ड
- वाहन चालक परवाना
- पासपोर्ट
- निवृत्ती वेतन दस्तऐवज
- संसद सदस्य/विधानसभा सदस्य
- विधान परिषद सदस्य यांना जारी केलेले ओळखपत्र
- मनरेगा योजनेचे जॉब कार्ड

मतदार यादीतील नाव, केंद्र असे शोधा
निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात. बऱ्याचदा मतदार यादीतून नाव वगळले जाऊ शकते. त्यामुळे आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी National voters service portal या मतदार यादीमध्ये देत असते आणि www.voterportal.eci.gov.in या लिंकवर क्लिक करून आपले मतदार केंद्र शोधता येणार आहे.

..तर कोणाशी संपर्क साधावा
- निवडणूक संबंधित कुठलीही शंका असल्यास १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा.
|
ऑनलाइन नोंदणीसाठी
-www.nvsp.in
-www.voterportal.eci.gov.in

ऑनलाइन नोंदणीसाठी
- आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा
- मतदान सुविधा केंद्र

अशी असेल प्रक्रिया
- मतदानाला तयार ः तुम्ही मतदान कक्षात प्रवेश करताच तिसरे मतदान अधिकारी मतदान यंत्र सज्ज करतात व मतदान यंत्रावरील ‘ready’ दिवा पेटतो
- मतदान करा ः मतदान यंत्रावरील तुम्ही निवडलेल्या उमेदवाराचे नाव/चिन्ह यासमोरिल निळे बटण दाबा
- दिवा पहा ः तुम्ही निवड केलेल्‍या उमेदवाराच्या नाव/चिन्हासमोरील लाल दिवा पेटेल
- आपल्या मताची खात्री करा ः व्हीव्हीपॅट यंत्रावर आपण मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव व चिन्ह असलेली पावती दिसेल व त्या यंत्रामध्ये ती पावती छापली जाईल
- बीप आवाज ऐका
- यशस्वीरीत्या मतदान झाल्याचे खूण म्हणून मतदान यंत्रामधून बीप आवाज येईल

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सुविधा
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक व्यक्तींसाठी सुविधेसाठी ॲपची सोय केली आहे. केंद्रावर रॅम्प व व्हील चेअर, ब्रेल लिपीसह मतदान यंत्र, विशेष स्वयंसेवक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने सुविधा. साईन लॅग्वेज, दिव्यांगसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com