
पीसीएमटी सेवानिवृत्तांचा निगडीत स्नेहमेळावा
पिंपरी, ता. २१ : निगडीमध्ये पूर्व पीसीएमटी सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा रविवार (ता. १९) रोजी आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांच्या मार्गदर्शनात शशिकांत भैरवकर, रवींद्र लांडगे, राजेंद्र टकले, लक्ष्मण कावली, सुनील मोरे, विनायक वायकर, अमोल घोजगे, प्रफुल शिंदे, संजय घाडगे, जयसिंग यादव, पंढरीनाथ पोटफोडे, निखिल कुंभार यांच्या सहकार्याखाली आयोजित करण्यात आला होता.
पूर्व पीसीएमटीचे अध्यक्ष दत्तोबा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुरेश चिंचवडे, माजी सभापती दिलीप बालवडकर, नानासाहेब सोनवणे, अल्ताफ सय्यद, सुनील दिवाण, शिरीष कालेकर, देहूगाव संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, पालखी सोहळा अध्यक्ष भानुदास मोरे, सर्व माजी ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी आजी-माजी सेवकांचे मनोगत, शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे जीवन चरित्र’ या विषयावर व्याख्यान उत्साहात पार पडले.