मतदान केंद्रावरील साहित्याचे
शनिवारी थेरगावात वाटप

मतदान केंद्रावरील साहित्याचे शनिवारी थेरगावात वाटप

पिंपरी, ता. २१ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप शनिवारी (ता. २५) केले जाणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले.
निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सेक्टर अधिकारी आणि संगणक चालकांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. कर्तव्ये, जबाबदारी व आवश्यक कामकाजाबद्दल सूचना केल्या. निवडणूक समन्वयक प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड उपस्थित होते. साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे होईल. त्यासाठी १११ कर्मचारी व स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी, नियंत्रण पथक नियुक्त केले आहे. शनिवारी सकाळी सात वाजेपासून साहित्य वाटप केले जाईल. रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजेपासून साहित्य स्विकारले जाईल.

शनिवारची कामे
मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची हजेरी, मतदान केंद्राचे साहित्य केंद्राध्यक्षांच्या ताब्यात देणे, ईव्हीएम अर्थात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, मतदान केंद्राचे साहित्य वाटप करून नोंद घेणे.

रविवारची कामे
ईव्हीएम यंत्र ताब्यात घेणे, मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध सीलबंद पाकीटे आणि लिफाफे, ताब्यात घेतलेल्या साहित्याच्या नोंदी करणे, ताब्यात घेतलेले साहित्य दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थितपणे ठेवणे.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com