
अल्ट्रा कॉर्पोटेक व बजाज ऑटो बॅडमिंटन स्पर्धेत संयुक्त विजेते
पिंपरी, ता. २२ ः ताथवडे येथे औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ५९ व्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुढील फेऱ्यांना उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेस २१ कंपन्यांच्या १२५ च्या पेक्षा अधिक पुरुष व महिला खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत अल्ट्रा कॉर्पोटेक व बजाज ऑटो-आकुर्डी संयुक्त विजेते ठरले.
ही स्पर्धा थिसेनकृप कंपनीतर्फे आयोजित केली आहे. टाटा मोटर्स, प्राज, थरमॅक्स, ऑर्डनन्स फॅक्टरी, बजाज ऑटो-आकुर्डी, बजाज ऑटो-चाकण, एनप्रो, एसकेएफ, फ्लॅश, थिसेन कृप, फौरेशिया, डॉन्फॉस, सिग्मा, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे प्रास्ताविक कौस्तुभ नाडगोंडे (थिसेन कृप) यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर यांच्या हस्ते झाले. आयोजन तन्मय भावे यांनी तर स्पर्धेचे व्यवस्थापन गोविंद लोहुमी, सजित दास, मोहित बेनाडीकर यांनी केले. या स्पर्धेस श्रीजय तावडे, अमोल देशमुख, सत्यजित देशमुख, लोकेश कुमार यांचे सहकार्य लाभले. तुषार भुजबळ यांनी आभार मानले. औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदीप वाघ, भानू कुलकर्णी उपस्थित होते. बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचे अंतिम फेरीचे विविध गटातील निकाल खालील प्रमाणे आहेत ः
१) पुरुष एकेरी : नरेंद्र गोगावले (अल्ट्रा कॉर्पोटेक) विजयी विरुद्ध शंतनू डोके (अकसेनचर) १५-६,१५-८.
२) पुरुष दुहेरी : विश्वराज यादव व कुणाल पाटणे (दसाल्ट सिस्टिम्स) विजयी विरुद्ध नरेंद्र गोगावले व अशोक भोसले (अल्ट्रा कॉर्पोटेक), १५-१२,२०-२१,१५-७.
३) महिला एकेरी : निष्ठा रॉय (बजाज ऑटो-आकुर्डी) विजयी विरुद्ध मानली कुलकर्णी (केपीआयटी)
४) महिला दुहेरी : साक्षी पोतदार व सोनाली सामल (फॉरेशिया) विजयी विरुद्ध शिवानी भडंगे व सोनिया अडसूळ (टाटा मोटर्स) १५-१०,१५-१२.
५) ज्येष्ठ (४५ वर्षांवरील) पुरुष एकेरी : केदार टाकसाळे (थिसेंन कृप) विजयी विरुद्ध ललित कुमार पांडे (बजाज ऑटो-आकुर्डी) १५-८,१५-२.
६) ज्येष्ठ (४५ वर्षांवरील) पुरुष दुहेरी:ललित कुमार पांडे व विनीत कुमार रत्नपुरा(बजाज ऑटो-आकुर्डी) विजयी विरुद्ध अमोल आपटे व श्रीराम जोशी (टाटा मोटर्स),१५-७,१५-१०.
७) मिश्र दुहेरी : स्वप्नील एम व आदिती काळे (टीसीएस) विजयी विरुद्ध नरेंद्र गोगावले व रीना. बी (अल्ट्रा कॉर्पोटेक)