अराजकता माजवणाऱ्या
भाजपला पराभूत करा 
नाना काटे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांचे आवाहन

अराजकता माजवणाऱ्या भाजपला पराभूत करा नाना काटे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांचे आवाहन

पिंपरी, ता. २२ : देश आणि राज्यात अराजकाची स्थिती भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. त्याविरोधात मत मांडण्याची संधी या निवडणुकीने निर्माण केली आहे. ही निवडणूक तरूणांनी हाती घेतली असल्याने या निवडणुकीत नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी सांगवी येथे बुधवारी (ता. २२) व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी पवार बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘देशात जातीय तणाव वाढवायचा. तोडा आणि फोडा या ब्रिटीशांच्या नितीनुसार हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे. त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल. नोटाबंदी, जीएसटी आणून सामान्य माणसांचे जीवन वघड करून टाकले आहे. असे निर्णय घेण्यापूर्वी संसद आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. लहरी राजाच्या बेबंद कारभाराला आळा घालण्याची सुरवात चिंचवडमधील पोटनिवडणुकीतून करावी.’’
दरम्यान; वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी रावेत येथील पवार यांच्या सभेत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नाना काटे यांना पाठिंबा दिला. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे बंधू आहेत. रिपब्लिकन सेना हा वंचितचा एकेकाळी सहकारी पक्ष होता. परंतु; २०२० मध्ये तो बाहेर पडला. त्यांची फक्त २०१९ च्या निवडणुकीत एकत्र भूमिका होती.
पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, लोकशाही मूल्यांची पायमल्ली भाजपकडून होत आहे. अशावेळी लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन, संविधान धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींविरुध्द लढले पाहिजे. भाजपच्या संविधानविरोधी भूमिकेला थांबविण्याची सुरवात चिंचवड मतदारसंघातून होईल. त्यामुळे काटे यांच्या विजयासाठी रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील. यापुढील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन सेना महाविकास आघाडीच्या सोबत असेल व प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव होईल.
फोटोः 26397, 26364

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com