विकास कामांवरून मतदानाचा निर्णय घ्या पिंपळे निलखमध्ये अश्र्विनी जगताप यांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास कामांवरून
मतदानाचा निर्णय घ्या
पिंपळे निलखमध्ये अश्र्विनी जगताप यांचे आवाहन
विकास कामांवरून मतदानाचा निर्णय घ्या पिंपळे निलखमध्ये अश्र्विनी जगताप यांचे आवाहन

विकास कामांवरून मतदानाचा निर्णय घ्या पिंपळे निलखमध्ये अश्र्विनी जगताप यांचे आवाहन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : पिंपळे निलखच्या विकासात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान आहे. ही कामे आज तुमच्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे काम केलेल्यांनाच मतदान करा, असे आवाहन चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी बुधवारी (ता. २२) नागरिकांना केले.
पिंपळे निलखमधील नागरिकांची घरोघरी जाऊन, भेट घेत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. काही भागात त्यांनी कोपरा सभाही घेतल्या. भाजपला मतदान करून, मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी उपमहापौर नानी घुले, नगरसेविका आरती चोंधे, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, नितीन इंगवले, अशोक शिंदे यांच्यासह भाजप-शिवसेना तसेच मित्रपक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अश्विनी जगताप म्हणाल्या, “पिंपळे निलखमधील नागरिकांनी नेहमीच माझ्या पतीला मदत केली. तुम्ही दिलेली साथ त्यांच्यासाठी ताकद होती. त्या बळावरच त्यांनी चिंचवड मतदारसंघाचा कायापालट केला.’’

‘‘आमदार म्हणून आणि महापालिकेतील असलेली सत्ता याच्या मदतीने माझ्या पतीने पिंपळे निलख भागात सर्व प्रकारची कामे केली. आज या भागात चांगले रस्ते आहेत. उद्याने आहेत. वीज, पाणी आहे. काही प्रश्न अजून राहिले आहेत. काही कामे करायची आहेत. माझ्या पतीने केलेल्या कामासाठी मला मतदान करा. आपण सारे मिळून राहिलेले प्रश्न सोडवूया.
- अश्विनी जगताप, भाजप उमेदवार

फोटोः 26498