Wed, May 31, 2023

विधवा, घटस्फोटित योजनेतील
वयाची अट रद्द करण्याची मागणी
विधवा, घटस्फोटित योजनेतील वयाची अट रद्द करण्याची मागणी
Published on : 23 February 2023, 10:12 am
पिंपरी, २३ ः महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. अटलबिहारी वाजपेयी विधवा व घटस्फोटित योजनेंतर्गत विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेतले असल्यास २५ हजार आणि प्रशिक्षण घेतले नसल्यास १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अर्ज केलेल्या दिनांकास ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामुळे अनेक महिला वंचित राहात असून योजनेलाही अल्पप्रतिसाद मिळत आहे. ही अट रद्द करून ५० वर्षावरील महिलांना योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिका प्रशासकाकडे केली आहे.