मिळकतकर वसुलीसाठी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकर वसुलीसाठी
‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’
मिळकतकर वसुलीसाठी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’

मिळकतकर वसुलीसाठी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ३१ मार्चअखेर अर्थात पुढील ३६ दिवसांत ३५० कोटी रुपये वसुलीचे लक्ष ठेवले आहे. वारंवार आवाहन करून मोठे व्यावसायिक, कंपन्या थकीत मिळकतकर कर भरत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ स्वीकारली असून कोणत्याही थकबाकीदार व्यक्ती, संस्था, कंपन्यांबाबत सहिष्णुता दाखविण्यात येणार नाही, असा इशारा महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.

सोमवारपासून नावे प्रसिद्ध
गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मूळ कर थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवारपासून प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये निवासी मालमत्ताधारक, कंपन्या, वेगवेगळ्या संस्था, व्यावसायिक, व्यापारी अशी बड्या व्यक्तींचाही समावेश आहे.

वसुलीसाठी बंदोबस्तात वाढ
महापालिका करसंकलन विभागाचे १७ परीक्षेत्र (झोन) आहेत. सर्व झोनमध्ये थकबाकी वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या झोनच्या वसुली पथकामधील कर्मचारी व सुरक्षा पथक अर्थात एमएसएफ जवानांची संख्या वाढविली आहे. यामध्ये चिखली, चिंचवड, वाकड, थेरगाव या झोनचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात मिळकतकर (रुपयांत)
आजपर्यंत वसुली ः ६४५ कोटी
गेल्या वर्षी मार्चअखेर वसुली ः ६३२ कोटी
चालू वर्षातील उद्दिष्ट ः १,००० कोटी
अद्याप उद्दिष्टपूर्ती बाकी ः ३५५ कोटी

वस्तुस्थिती व वास्तव
पूर्ण कर भरलेले मालमत्ताधारक ः ३ लाख ६० हजार
अंशतः व पूर्णतः कर थकबाकीदार ः २ लाख ५० हजार
आतापर्यंत मालमत्ता जप्त ः ६०० पेक्षा अधिक
आतापर्यंत नळजोड तोडले ः २०० पेक्षा अधिक

मिळकतकर वसुलीसाठी उपाययोजना
- मिळकतकर वसुली मोहीम कडक करणार
- पाच हजार नवीन अधिपत्रे काढली
- बिगर निवासी मालमत्तांवर जप्ती, निवासींचे नळजोड तोडणार
- राहत्या घराच्या जंगम मालमत्ता जप्त करणार