राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत निर्भय कन्या अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत 
निर्भय कन्या अभियान
राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत निर्भय कन्या अभियान

राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत निर्भय कन्या अभियान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत निर्भय कन्या अभियान व स्वरक्षण यावर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पहिल्या सत्रात मार्शल आर्ट्स गणेश मांढरे व कारभारी गायकवाड यांनी स्वसंरक्षण कसे करावे, याबाबत माहिती दिली. कराटेचे प्रशिक्षण दिले. दुसऱ्या सत्रात अनुराधा हरकरे यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यावर मार्गदर्शन केले. अलकनंदा माताडे व ज्योती विश्वकर्मा यांनी सूत्रसंचालन केले. नियोजन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी समद जमादार, रेखा पाटील, वैशाली सिनलकर-वाघुले यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. प्रा. मेघना खरात, प्रा. विनिता भुजंग, प्रा. श्रीपाद मेढे, प्रा. राहुल जायभाये यांच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील व विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.