डीजेच्या तालावर होळी खेळण्याचा ट्रेंड तरुणाईचा कल ः एकाच ठिकाणी रेन डान्स, मेजवानी, फायर शो फेस पेटिंगकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीजेच्या तालावर होळी खेळण्याचा ट्रेंड 
तरुणाईचा कल ः एकाच ठिकाणी रेन डान्स, मेजवानी, फायर शो फेस पेटिंगकडे कल
डीजेच्या तालावर होळी खेळण्याचा ट्रेंड तरुणाईचा कल ः एकाच ठिकाणी रेन डान्स, मेजवानी, फायर शो फेस पेटिंगकडे कल

डीजेच्या तालावर होळी खेळण्याचा ट्रेंड तरुणाईचा कल ः एकाच ठिकाणी रेन डान्स, मेजवानी, फायर शो फेस पेटिंगकडे कल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : कोरड्या व ओल्या रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावणाऱ्या पारंपारिक होळीचे चित्र बदलले असून, डीजेच्या तालावर ठिकठिकाणी होळी खेळण्याचा ट्रेंड वाढला आहे. एकाच ठिकाणी रेन डान्स, दिवसभर जेवणाची मेजवानी, पूल पार्टी, ढोल संगीत, फायर शो, फेस पेंटींग, एअर शो आणि दिवसभर म्युझिक कॉन्सर्ट अशा विविध प्रकारे आनंदाची उधळण करणाऱ्या होळीकडे तरुणाईचा कल वाढला आहे. आतापासूनच रिसॉर्ट व हॉटेलमध्ये होळी खेळण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाईचे नियोजन सुरु असल्याचे दिसून येत आहे.
होळीचा सण ७ मार्चला आहे. त्यासाठी दिवसभर संगीताची मेजवानी असलेले रिसॉर्ट, हॉटेलचे बुकिंग सुरु झाले आहे.
होळी खेळण्यासाठी ग्रुपसाठी अधिक प्रमाणात सवलती मिळत आहेत. कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण हे रेन डान्स, पूल पार्ट्या, आवडते पेय, विविध रंगाची उधळण ती देखील म्युझिकच्या तालावर असल्यामुळे तरुणाईचा कल याकडे वाढला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये देखील हा कल वाढला आहे. यामध्ये नोकरदार वर्ग व आयटी कर्मचाऱ्यांचेही सर्वाधिक आकर्षण आहे.

लोणावळा, खराडी, मावळ, मुळशी भागात या होळींचे अधिक प्रमाणात नियोजन रिसॉर्ट व खुल्या जागांमुळे दिसून येत आहे. यातही कुटुंबासाठी व चिमुकल्यांसाठी वेगळा झोन होळीचा असल्यामुळे कुटुंबीयांसोबतही होळी खेळण्याचे नियोजन सुरु आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ पर्यंत तर, काही ठिकाणी रात्रीपर्यंत होळी खेळण्याचा आनंद पूर्ण दिवस लुटता येत आहे. शिवाय, होळीचे पॅकेज लहानांसाठी ४०० रुपये तर, मोठ्या वयोगटासाठी ८०० ते ९०० रुपयांपर्यंत आहेत. त्याचबरेाबर आवडते जेवण, नाष्टा दिला जात आहे. यासाठी सर्वांना आधारकार्डचा पुरावा देणे गरजेचे आहे.
---
डीजेवरील होळीचा ट्रेंड अधिक वाढला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत अधिक प्रमाणात तरुणाईचा प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच सोसायटी किंवा रस्त्यावर मनसोक्त होळी खेळता येत नाही. शिवाय, तरुणाईला सर्वाधिक क्रेझ म्युझिकची आहे. आतापासूनच होळी सेलिब्रेशनचे कॉल येत असून, सोशल मीडियावरुनही अधिक प्रतिसाद मिळत आहे.
- शिवा, होळी व्यवस्थापक, मुळशी
--