बाईक टॅक्सीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईक टॅक्सीच्या विरोधात
आंदोलन करण्याचा इशारा 
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या बैठकीत निर्णय
बाईक टॅक्सीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या बैठकीत निर्णय

बाईक टॅक्सीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या बैठकीत निर्णय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये बेकायदेशीररीत्या बाईक टॅक्सी सुरू आहे. सरकारची परवानगी न घेता ‘मोबाईल ॲप’द्वारे बुकिंग करून, बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक धोकादायक पद्धतीने होते. त्यामुळे न्यायालयाने ते रद्द केले. राज्य सरकारने परिवहन संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनाचे नियमन करून, अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये दुचाकीला परवानगी देण्यासाठी समिती नेमलेली आहे. त्यातून बाईक टॅक्सी परवानगी सुरू करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. रिक्षाचालकांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा शनिवारी (ता. २५) दिला आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, सारथी चालक मालक महासंघातर्फे आज बैठक घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, दिनकर खांडेकर, अशोक पवार, आदिक बोऱ्हाडे, राम कांबळे, राजू व्हनमाने, बालाजी भोसले आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले, ‘‘राज्यामध्ये रिक्षा चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून, बाईक टॅक्सीचा विरोधातील लढा यशस्वी केल्यानंतर राज्य शासनाच्या मनामध्ये वेगळीच भूमिका आहे. राज्यात दुचाकी संवर्गातील वाहनांना प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परिवहन संवर्गात नोंदणी करून अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा देण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यासाठी माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून, बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा प्रयत्न असून, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे रिक्षाचालकावर मोठी संक्रांत येणार आहे. ते कमी दरात सेवा देत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबत मोठा धोका होणार आहे. हा अहवाल सकारात्मक सादर करून, राज्य शासन परवाना देण्याचा विचारात आहे. काही काळ रिक्षा चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करून, यावर कायमस्वरूपी बंदी ठेवावी. अन्यथा शिंदे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक तीव्र आंदोलन करतील.’’
फोटोः 27038.