विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

विद्येचे प्रांगण ः शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

चितनदिन, स्पर्धा अन् पुरस्कार वितरण


पिंपरी ः निगडी-यमुनानगर येथील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल सहावीच्या तिन्ही वर्गांसाठी शाळेत भाजी मंडई भरविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गटनिहाय भाज्या ठरवून भाज्या आणल्या. शाळेतील शिक्षक व पालकांनी या चिमुकल्यांकडून भाजी खरेदीचा आनंद घेतला. यामध्ये मुलांनी उत्साहाने भाग घेतला. मुले खूप आनंदी होती उत्साहाने जणू भाजी बाजारच शाळेच्या परिसरात भरला होता, असे वाटत होते. मुलांना या उपक्रमाद्वारे नफा, तोटा, व्यवहारज्ञान, आपल्या मालाची विक्री कशी करावी हे आपोआपच शिकायला मिळाले. पालकही या उपक्रमात आनंदाने सहभागी झाले होते. चिमुकल्यांकडून भाजी खरेदी करण्यासाठी पालकही उत्साहाने सहभागी झाले होते. शाळेतील शिक्षकांनीही भाजी खरेदीचा आनंद घेतला.

ताराबाई मुथा कन्या प्रशाला
चिंचवड येथील सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्रशालेत जागतिक स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बडेन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रशालेच्या प्राचार्या भारती सारंगा, विभागप्रमुख हंसा लोहार, सुषमा बंब उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाइड चळवळीचे जनक लॉर्ड बडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गाइड च्या विद्यार्थिनींनी गाइड प्रार्थना, झंडा गीत म्हटले. प्रास्ताविक विभाग प्रमुख हंसा लोहार यांनी केले. मनिषा लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून स्काऊट गाइड चे महत्त्व सांगितले. गाइड च्या विद्यार्थिनींनी विविध टाळ्यांचे प्रकार व मनोरंजक गाणी सादर केली. प्राचार्या भारती सारंगा यांनी स्काऊट गाइड च्या वचनांचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन अर्चना भोर यांनी केले. विभागप्रमुख सुषमा बंब यांनी आभार मानले.


मॉडर्न हायस्कूल
निगडीतील मॉडर्न हायस्कूल प्रशालेत विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा, निबंध तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोवाडा, शिवगीत, शिवगर्जना, राजमुद्रा भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे, संस्था सदस्य कुटे यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. सूत्रसंचालन अमृता गायकवाड यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या श्रुती डौले, आर्या जामदार यांनी छ. शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रशालेच्या प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांचे मार्गदर्शन लाभले. मीना अधिकारी, कुसुम पाडळे, आशा कुंजीर , मनीषा बोत्रे, वृषाली सलगर, जयश्री चव्हाण, सुजाता ठोंबरे, कविता गायकवाड, गंगाधर सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. गंगाधर सोनवणे यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह श्यामकांत देशमुख, शाळा समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे, शाळेच्या प्रमुख्याध्यापिका मृगजाताई कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे कौतूक केले.


शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा सर्व परिसर शिवमय झाला होता.शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवजन्माचा पाळणा म्हटला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले बाल शिवराय आणि भगवे झेंडे, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. दैवत छत्रपती, एकच राजा इथे जन्मला राज आलं राज आलं, शिवबा माझा मल्हारी अशा गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. शिवरायांची आरती, पोवाडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन चंदा नामदे यांनी केले. तेजस कांबळे या विद्यार्थ्यांने सूत्रसंचालन केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. संगीता शहासने, मंदा कोकरे, ज्योत्स्ना वाव्हळ, राजश्री गायकवाड, सुनीता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.


दुर्गा रत्न पुरस्कार प्रदान
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सुनीता सुधीर नवले यांना ‘दुर्गा रत्न’ पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अभीष्टचिंतनानिमित्त दरवर्षी शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल गुंजाळ, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, विभाग प्रमुख उमाकांत काळे, संतोष शिरसाट उपस्थित होते. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा तसेच सहायक सचिव प्रा. अनिल कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.

पोदार इंटरनॅशनल स्कूल
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पोदार इंटरनॅशनल स्कूल, सारा सीटीतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलन झाले. निष्ठा, दयाळूपणा, करुणा, सहकार्य, शांतता, या मानवी मूल्यांवर आधारित विषयांवर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. या वेळी डॉ. गीतांजली गुप्ता, पोदार इंटरनॅशनल स्कूल पुणे विभागाचे सचिव डी. एस.जे. फ्रँकलिन उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना करांडे यांनी केले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापिकांचे कुशल नेतृत्व व सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी परिश्रम घेतले.

अराईज इंटरनॅशनल स्कूल
भोसरी येथील अराईज इंटरनॅशनल स्कूल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्य जितेंद्र खैरनार, सायबर तज्ज्ञ बोऱ्हाडे, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थांनी ‘कोंढाणा विजय’ हा प्रसंग सादर केला. त्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व पोवाडा सादर करण्यात आला. प्राचार्य खैरनार यांनी ‘वीरगाथा ऑफ श्री छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर सादर केले. विविध प्रसंग, पोवाडे व नृत्य या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नृत्य शिक्षक राहुल राजपूत, संगीत शिक्षक नीलेश कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सरस्वती विद्यालय
निगडी प्राधिकरण, सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन ‘चिंतनदिन’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रा. गोविंदराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. प्राचार्या साधना दातीर, उप-प्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर उपस्थित होते. स्काऊटर रमेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शालेय स्वच्छता हा उपक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक सुनीता चौधरी यांनी तर सूत्रसंचालन मनीषा जाधव व स्वाती देवरे यांनी केले. आभार रवींद्र कुवर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे आयोजनासाठी कैलास कोशिरे, गाईडर जयश्री घावटे, रेश्मा बनसोडे, देवरे स्वाती, जाधव मनीषा यांनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com