जुनी पेन्शन योजना 
सरकारला द्यावीच लागेल

जुनी पेन्शन योजना सरकारला द्यावीच लागेल

पिंपरी, ता. २६ ः शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा आम्ही वारंवार पाठपुरावा करत असून जुनी पेन्शन योजना सरकारला मंजूर करावीच लागेल. यासाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यात शिक्षकांसाठी मेडिकल कॅशलेस कार्डची सुविधा मिळण्याबाबतही पाठपुरावा सुरू असल्याची, माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काळे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सदिच्छा भेट दिली. या दरम्यान श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थितीत आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर या निमित्ताने चर्चा करण्यात आली.
या वेळी चोपडा हायस्कूलचे प्राचार्य विक्रम काळे, प्रा. संतोष फाजगे (सरचिटणीस राज्य महासंघ), प्रा. लक्ष्मण रोडे, शिवाजीराव खांडेकर, एम. एस. शहापुरे, एस. टी. पवार, सिद्धार्थ जाधव, विजय जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या पाटील यांनी केले. तर आभार लक्ष्मण रोडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com