पिंपरीत ७२ क्विंटल भाज्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत ७२ क्विंटल भाज्यांची आवक
पिंपरीत ७२ क्विंटल भाज्यांची आवक

पिंपरीत ७२ क्विंटल भाज्यांची आवक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (ता. २६) फळभाज्या व भाजीपाल्याची आवक ७२ क्विंटल झाली आहे. त्यात फळभाजी ५० टक्के तर पालेभाज्यांचा २२ टक्क्यांचा समावेश आहे. सर्वाधिक वांगी व बीटाची तसेच, मक्याची आवकही जास्त असून उन्हाळ्यात बीटला मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे.
सध्या टोमॅटोचाही भाव कोसळल्याने बाजारात टोमॅटो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उन्हाळ्यात टोमॅटोलाही मागणी अधिक आहे. सध्या टोमॅटोची आवक २२ क्विंटल इतकी झाली आहे. तर, किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर वीस रुपये आहे. तर, मंडईत हाच भाव आठ रुपये आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे शेवगा ४० रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. पालेभाज्यांची आवक ही जास्त असून, कोथिंबीर सर्वाधिक स्वस्त आहे. किरकोळ बाजारात सध्या कोथिंबीरीचा भाव १० रुपये गड्डीप्रमाणे आहे. कोथिंबिरीची आवक मंडईत ३४०० गड्डी सर्वाधिक झालेली आहे. तर, मेथीची आवकही २२५० गड्डी झालेली आहे. किरकोळ दराने १० रुपयाला ही गड्डी मिळत आहे. तर, शेपूची आवक ९०० गड्डी व पालकची आवक १५०० गड्डी इतकी झाली आहे. मुळ्याची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असून मुळ्याची आवक ८०० गड्डी झाली आहे. मुळ्याला देखील चांगली मागणी आहे.
ऊन चांगले चटकत असून अद्याप भाजीपाला महागला नसल्याचे चित्र आहे. फळभाज्या व पालेभाज्या स्वस्तात व मुबलक प्रमाणात मिळत आहे. आवक सरासरी प्रमाणे असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात लिंबालाही लोणच्यामुळे अधिक मागणी आहे. काही ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांकडे तोतापूरी कैरी विक्रीसाठी आली आहे. मात्र, मंडईत कैरी अद्याप दाखल झालेली नाही.

फळभाज्यांची आवक क्विंटलमध्ये
कांदा : ७, टोमॅटो : २२, घेवडा : ४, फ्लॉवर :४, कोबी : ६, वांगी: ४, बीट : २ , मका : २

फळभाज्यांचे दर किलोमध्ये
कांदा : ८ रुपये, टोमॅटो : १२, घेवडा : ३०, फ्लॉवर : १५, कोबी : ६, वांगी : २०, बीट : १२, कोथिंबीर :७, शेपू : ७ , पालक : ८, मुळा : ७, मका १०