
मतदान
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मतदारसंघाच्या उत्तरेकडील मामुर्डी गावापासून दक्षिणेकडील जुनी सांगवीपर्यंत आणि पूर्वकडील चिंचवडगावापासून वाकडपर्यंतच्या ५१० मतदान केंद्रांवर मतदान झाले. बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. निवडणूक विभागानेही मतदान केंद्रांबाहेर मतदार सहायता केंद्र उभारले होते. त्याद्वारे मतदारांना मतदार चिठ्ठ्या देण्यात आल्या. सायंकाळी सहानंतरही अनेक केंद्रांवर रांगा लागून होत्या. ज्येष्ठांसह युवकांनीही मतदानाचा अधिकार बजावला. सायंकाळी पाचपर्यंत ४१.०६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे उर्वरित एक तासात किती मतदान होईल, याचीच उत्स्कुता होती. मात्र, वेळ संपल्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने रात्री आठनंतरही मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा अंतिम टक्केवारी मिळायला उशिर झाला.