
मराठी राजभाषा दिनाचा
मराठी राजभाषा दिन ः शाळा महाविद्यालयांत विविध उपक्रम
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
पिंपरी, ता.२७ ः शहरातील शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रमांनी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शाळांमध्ये महाराष्ट्रातले अनेक दिग्गज साहित्यिक लेखकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निगडी- सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात झाला. मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत चांदगुडे, ज्येष्ठ कवयित्री वाणी ताकवणे, संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना दातीर, उप-प्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकीळा आहेर उपस्थित होते. आठवीच्या पाठ्यपुस्तकातील त्यांच्या आळाशी कवितेच्या निर्मितीची माहिती सांगून कवितेचा आशय स्वभाषेत स्पष्ट केला. मुख्याध्यापिका दातीर यांनीही विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे काव्यसंमेलन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात अनेक कवितांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री घावटे यांनी केले. आभार रविंद्र कुवर यांनी मानले.
कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन
जयवंत प्राथमिक शाळा भोईरनगर येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी केले. व त्यांनी कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती सांगितली. पुढील पिढीने देखील मराठी भाषेचे संवर्धन करावे यासाठी कुसुमाग्रजाविषयी भाषण तसेच निबंध लेखन कथा नाटक कविता गायन पोवाडे नृत्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केलेला होता. सूत्रसंचालन जयश्री मोरे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी साकारल्या भूमिका
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या प्राथमिक विभागात मराठी राज्यभाषा दिन आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातले लेखक, कवयित्रींच्या रूपात आमचे बालचमू येऊन स्वगत सादर केले. यामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, लोकमान्य टिळक ,ग. दि. माडगूळकर , वि. दा. सावरकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, बहिणाबाई, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडकेपर्यंत अनेक जण आमच्या शाळेच्या प्रांगणात अवतरले होते. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर योगेश आंबेकर सरांनी राजभाषा दिनाची माहिती सांगितली. साने गुरुजी कथा माले तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सुरेखा भामरे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत गायले.
मराठी भाषेवर व्याख्यान
काळेवाडी येथील एम. एम. विद्यामंदिर शाळेत मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वाल्हेकर यांनी केले. मराठी भाषेचे महत्व व संवर्धन केले पाहिजे, या विषयी मार्गदर्शनपर भाषण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी केले. मराठी विषय शिक्षिका एस. यू. शिंदे व देवकर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले.
पूजन आणि मार्गदर्शन
पिंपरी सोहम सार्वजनिक ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. पुणे साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी केले. आभार प्रकाश ब्राह्मणकर यांनी आभार मानले.
मराठी कवितांचे सादरीकरण
यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विदयालय, यशस्वी इंग्लिश मिडीयमस्कूलमध्ये राजभाषा मराठी दिनी गायत्री हरणे, अल्फीया बेग, वैष्णवी पांचाळ, तनिष्का माने, नंदिनी बोऱ्हाडे, कोमल पुंडकर, जहीर शेख, मायरा माने, स्वराली लवटे, श्रावणी मेटकर, ईश्वरी घोडके, जारा शेख, जानव्ही माने, गायत्री जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी कविताचे गायन विद्यार्थ्यांनी केले. राजभाषा मराठी दिनाच्या निमित्ताने सर्वांनी राज्यगीताचे गायन केले. अध्यक्ष सुभाष देवकाते मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते उपस्थित होते.