Fri, June 9, 2023

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने
रस्त्यात अडवून ऐवज लुटला
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्यात अडवून ऐवज लुटला
Published on : 27 February 2023, 2:50 am
पिंपरी, ता. २७ : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याच्याकडील ऐवज लुटला. हा प्रकार वाकी येथे घडला. प्रवीण ज्ञानेश्वर सांडभोर (रा. वृंदावन सोसायटीजवळ, राजगुरुनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मालकीच्या दुचाकीवरून पुण्यातील बंडगार्डन येथून राजगुरुनगर येथे जात होते. दरम्यान, वाकीतील संतोषनगर येथे चार आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना थांबवले. अंधारात नेऊन त्यांच्याकडील ३० हजार ७०० रुपये रोख व पाकिटातील लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, दोन एटीएम कार्ड घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोन दुचाकीवरून आरोपी राजगुरुनगरच्या दिशेने पसार झाले.