आरटीई प्रवेशाकडे पालकांचे डोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशाकडे पालकांचे डोळे
आरटीई प्रवेशाकडे पालकांचे डोळे

आरटीई प्रवेशाकडे पालकांचे डोळे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः आरटीई प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, यंदा फेब्रुवारी महिना संपला तरीही राज्य शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ सुरू केलेले नाही. परिणामी आता पालकांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया जून महिन्यापर्यंत लांबणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये तीन हजार २६६ टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साधारणपणे पालकांसाठीची नोंदणी प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता होती. आरटीईसाठी पात्र असलेल्या शाळांची तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा पालकांना होती. मागील कोरोनानंतर पालकांच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे या सवलतीचा फायदा मिळवण्यासाठी पालक प्रयत्न करीत आहेत. मात्र, यंदा फेब्रुवारी संपला तरीही राज्य शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ सुरू झालेली नाही.

पात्र शाळांमध्ये घट
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांना १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. गेल्या वर्षी १८९ शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले होते. यंदा १७२ शाळांनीच नोंदणी केली आहे. शाळांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की २० फेब्रुवारीपासून पालकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. कोविड काळात छोट्या आणि विनाअनुदानित असलेल्या इंग्रजी शाळा या विद्यार्थी संख्या नसल्याने बंद झाल्या. यात एकूण सहा शाळांचा समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

पालकांनी घ्यावी काळजी
दरवर्षी पालकांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी अनेक तक्रारी येतात. वारंवार सांगून देखील पालकही बऱ्याचवेळा सूचनांकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम मुलांच्या प्रवेशावर होतो, शैक्षणिक सत्रांवर देखील होतो. तेव्हा मान्यता प्राप्त आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आहेत का? याची खात्री करूनच पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा, अशा सूचना केल्या आहेत.


‘‘आरटीई अद्याप काही शाळांची नोंदणी झाली नाही. दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया संपल्यानंतर एकाच वेळी शहरातील पात्र शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज देण्यास सुरवात होईल’’
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक विभाग