Wed, May 31, 2023

तळेगाव नगरपरिषदेत
मराठी भाषा गौरव दिन साजरा
तळेगाव नगरपरिषदेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
Published on : 28 February 2023, 11:12 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २८ : मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रत्येक मराठी भाषिकांनी मराठी भाषेतच बोलले पाहिजे तसेच वाचनही केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रा. खांडगे म्हणाले की, प्रशासनातील प्रत्येकाने मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले होते. तर यावेळी व्यासपीठावर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, सोनबा गोपाळे गुरुजी होते. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या वेळी वृक्ष वाटप व पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले. वरिष्ठ अधिकारी रवींद्र काळोखे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.