मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे : शेवाळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषेची अस्मिता 
जपली पाहिजे : शेवाळकर
मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे : शेवाळकर

मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे : शेवाळकर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : सर्वांनी मराठी भाषेची अस्मिता जपण्याचे काम केले पाहिजे, असे मत प्रख्यात साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी केले. भारतीय जैन संघटना विद्यालय, संत तुकारामनगर येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, मुख्याध्यापक संजय जाधव, गजानन वाढे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.
शेवाळकर म्हणाले, ‘भाषा हे साधन आहे. भाषेतून साध्य होतो तो संवाद. जगात कुठेही गेले तरी आपल्या मातृभाषेला विसरू नका. आपल्या भाषेतच बोलण्याचा प्रयत्न करा. मराठी भाषेचा विकास करता-करता परस्परांमध्ये सामाजिक समतोल प्रस्थापित करून देशाचे उत्तम नागरिक बना.’
या वेळी प्राचार्य दिलीपकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माजी मुख्याध्यापक स्वर्गीय माणिकराव गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने २०२२ मध्ये मराठी विषयांमध्ये प्रथम आलेल्या तेजस शेमडकर याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, वक्तृत्व स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या पार्थ भागवते, सानिया शेख, पायल सिंह, अनुष्का काकडे यांचाही सन्मान करण्यात आला.
आयोजन उच्च माध्यमिक मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख अतिथींचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. संपत गर्जे यांनी करून दिला. प्रास्ताविक वैष्णवी सूर्यवंशी हिने केले. सूत्रसंचालन राजश्री तांबे या विद्यार्थिनीने केले. तर, आभार ओम खुर्पे यांनी मानले.