राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चिखलीत प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 
चिखलीत प्रबोधन
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चिखलीत प्रबोधन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चिखलीत प्रबोधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : लहानपणी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला दूध पिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बागुलबुवाची किंवा अंधाराची भीती दाखवीत. ही भुताची भीती दाखविणाऱ्या या खोलीमुळे अद्यापही आसपास भुते असू शकतात. असा समज मुलांच्या मनात घर करून आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. मनीषा महाजन यांनी नेवाळे, चिखली येथील विद्यार्थी कार्यक्रमात व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एस.एम.एन इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली येथे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम यशस्वी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. महाजन व क्रांती पोतदार यांनी चमत्कार कसे होतात याचे विद्यार्थ्यांना धडे दिले.
पोतदार यांनी चमत्कार कसे होतात याचे प्रयोग करून दाखवीत असताना चिठ्ठीत लिहिलेला मजकूर चिठ्ठी न उघडता वाचून दाखविला. ॲड. महाजन यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत अंधश्रद्धा कशी असते व कोण-कोणत्याप्रकारे केली जाते, याविषयी कार्यक्रम सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे तसेच, पालकांच्या शंकाचे निरसनही त्यांनी केले.
या वेळी इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथे कार्यरत असलेले संजय उबाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी. टी. कदम, संस्थेचे संचालक दत्तात्रेय नेवाळे, पांडुरंग वाघमारे, विष्णू मांजरे आदी उपस्थित होते. एसएमएन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रा. रजनी वाघमारे यांनी आभार मानले. अश्विनी गिराम यांनी सूत्रसंचालन केले.