Fri, June 9, 2023

डस्टबीन सफाईस नकार दिल्याने एकाला मारहाण
डस्टबीन सफाईस नकार दिल्याने एकाला मारहाण
Published on : 28 February 2023, 11:08 am
पिंपरी, ता. २८ : डस्टबीन साफ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाला दांडक्याने बेदम मारहाण करीत रोकड लुटली. ही घटना दिघी येथे घडली. अमित सुधाकर दिक्षित (रा. चौधरी पार्क, दिघी, मूळ-उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश ओव्हाळ व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे काम करीत असताना ओव्हाळ याने फिर्यादी यांना डस्टबीन साफ करण्यास सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिला असता ओव्हाळ याने फिर्यादीला बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर आळंदी रोड येथे फिर्यादीला चारही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. ओव्हाळ याने फिर्यादीच्या खिशातील चौदाशे रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.