
पोलिसाला मारहाण करीत मर्डरची धमकी
पोलिसाला मारहाण करीत मर्डरची धमकी
पिंपरी, ता. २८ : वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येणारा डंपर थांबविण्याचा इशारा केल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हिंजवडीचा भाई असल्याचे सांगत मर्डर करण्याची धमकी दिली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.
सोमनाथ रामदास दिवटे (रा. कावेरीनगर पोलिस लाईन, वाकड) असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित साखरे, प्रथमेश हांडे (दोघेही रा. हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे हिंजवडी वाहतूक शाखेत नाईक पदावर कार्यरत असून हिंजवडीतील फेज दोन येथील क्रोमा टी जंक्शन येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, एक डंपर वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येत असल्याने फिर्यादी यांनी त्यास थांबण्याचा ईशारा केला. याचा राग आल्याने डंपर मालक साखरे व त्याचा मित्र हांडे यांनी फिर्यादी यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साखरे याने शिवीगाळ करीत ''आमची गाडी अडवतो, तुझा तर मर्डरच करतो, मला ओळखले का मी हिंजवडीचा भाई अमित साखरे आहे, काढ रे हत्यार याचा मर्डर करून टाकू'' अशी धमकी दिली.
-------------------------