राष्ट्रीय विज्ञान दिन ः विविध शांळांमध्ये प्रयोगाचे सादरीकरण
पर्यावरण संवर्धन, विविध प्रकल्प प्रतिकृती

राष्ट्रीय विज्ञान दिन ः विविध शांळांमध्ये प्रयोगाचे सादरीकरण पर्यावरण संवर्धन, विविध प्रकल्प प्रतिकृती

पिंपरी, ता. २८ ः पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्‍यात आला. शाळांमध्ये पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सेव्ह अर्थ, सुका आणि ओला कचरा, जल प्रदूषण, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, सोलर पॅनेल, प्लास्टिक रिसायकलिंग, टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर, टाइडल एनर्जीद्वारे वीज निर्मिती, भूकंप आणि त्याचे परिणाम, श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसाचा कर्करोग आदी विषयावर आधारित वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.

पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहाच्या सभागृहात जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विज्ञानिकेतन विद्यालय, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर आधारित प्रयोग सादरीकरण केले. विज्ञान प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्यपरिषद चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, सुमीत मुंगसे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, शिक्षिका शारदा पोफळे, स्मिता बर्गे, सुनीता ठाकूर, हर्षदा वाजे, अश्विनी वाघमारे, श्रद्धा पांढरे उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका अश्विनी वाघमारे यांनी केले.


एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात विज्ञान दिन साजरा
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती मॉडेल्स तयार करून व त्याचे सादरीकरण करून विज्ञान दिन साजरा केला. यामध्ये धरणाची प्रतिकृती, सौर ऊर्जा प्रकल्प, दळणवळणाची साधने, संदेशवहनाची साधने, रोबोट, लॅपटॉप, कम्प्युटर, पत्राचा प्रवास जलशुद्धीकरण केंद्र, वॉटर फिल्टर, शेती व आधुनिक तंत्रज्ञान, ज्वालामुखी, सूर्यचूल, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, विहीर, हॅन्ड पंप, क्रेन, धबधबा, ग्रामीण विभाग, शहरी विभाग, ओला कचरा सुका कचरा, खत निर्मिती गांडूळ प्रकल्प असे विविध प्रकल्प प्रतिकृती / मॉडेल्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण प्रदर्शनाची तयारी इयत्ता चौथीच्या शिक्षकांनी केली होती.

सरस्वती माध्यमिक विज्ञान दिन
सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विज्ञान दिनाचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात झाला. नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. अगस्त्य इंटरनॅशनल फौंडेशनचे सदस्य ईश्वर पाईकराव, प्राजक्ता इंगळे, मुख्याध्यापिका साधना दातीर, उप-प्राचार्य श्री. विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर उपस्थित होते. यावेळी संजय जगताप यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. दातीर यांनीही विज्ञानामधील विविध उदाहरणांचे दाखले देत आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोनाली कापडणीस यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ईश्वर पाईकराव यांनी विज्ञानामधील विविध मनोरंजक प्रयोगांचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक अर्चना बुधकर यांनी केले. सूत्रसंचालन दिव्या सोनवणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com