
टेम्पो व मालासह दोघेजण पसार
टेम्पो व मालासह दोघेजण पसार
पिंपरी, ता. २८ : एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोहोचवण्यासाठी टेम्पोत भरलेला माल संबंधित कंपनीत न पोहोचवता दोघेजण टेम्पो व मालासह पसार झाले. हा प्रकार तळवडे येथे घडला.
तानाजी सोमाजी करपे (रा. फलके वस्ती, मोई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन त्रिपाठी (वय २९, रा. मध्यप्रदेश) व विजयकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या गाडीवर काम करणारा करपे याने तळवडेतील करवीर इंडस्ट्रीज या कंपनीतून फिर्यादीच्या गाडीत माल भरला. तो माल चाकण येथील रिलायबल ऑटो टेक कंपनीत डिलिव्हरी करणे गरजेचे असताना गाडी तेथे न नेता दुसऱ्याच ठिकाणी नेली. त्यानंतर गाडीतील माल काढून फिर्यादीच्या ओळखीच्या दशरथ गराडे यांच्यात टेम्पोत भरला. त्यानंतर करपे व गराडे यांच्या गाडीवरील चालक हे दोघेही दीड लाखांचा टेम्पो व तीन लाखांचा माल घेऊन पसार झाले आहेत.