Wed, May 31, 2023

एमआयडीसीकडून उद्या
पाणीपुरवठा बंद
एमआयडीसीकडून उद्या पाणीपुरवठा बंद
Published on : 28 February 2023, 2:17 am
पिंपरी, ता. २८ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील अशुद्ध पाणी पुरवठा केंद्रामधील देखभाल-दुरुस्ती विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजाकरिता गुरुवार (ता. २) रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, शुक्रवारी (ता. ३) रोजी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅंटोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील सर्व ग्राहकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा साठा करून ठेवावा, असे चिंचवड एमआयडीसी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.