खासगी प्रवासी बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निगडीतील प्रकार ः वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी प्रवासी बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी
निगडीतील प्रकार ः वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
खासगी प्रवासी बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निगडीतील प्रकार ः वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

खासगी प्रवासी बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडी निगडीतील प्रकार ः वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : मुंबई-पुणे महामार्गावर निगडी बस थांब्याच्या ठिकाणी रस्त्यावर बसगाड्या उभ्या करून, अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. रोज संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई- पुणे महामार्गावर टिळक चौक ते भक्ती-शक्ती उड्डाणपुलाखालील बाजूस मुख्य रस्त्यावर खासगी प्रवासी बस उभ्या करून वाहतूक सर्रास सुरु असते. याकडे निगडी वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळला आहे. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका व पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक कोंडी संदर्भात गेल्या वर्षी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याने कोंडीच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न झाले होते. सध्या खासगी बस दोन ते तीन महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर, निगडी गावठाण येथील मारुती मंदिर ते एसबीआय बँक या ठिकाणी अंडरपास बोगद्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्या ठिकाणी रस्त्यावर भुयारी मार्गाचे काम सुरू असून, दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने गाड्या वेगाने भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपुलावर जातात. त्यामुळे, अपघात होण्याची दाट शक्यता आहे.


नागरिकांच्या जिवाशी खेळ
----------------------
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने शिवनेरीच्या प्रवाशांसाठी वाहतूक बस थांबा उपलब्ध नाही. मधुकर पवळे उड्डाणपूल ते भक्ती-शक्ती उड्डाणपूल या दोन्ही उड्डाणपुलाच्या ठिकाणी निगडी येथील महामार्गावर प्रवाशांना उतरवून बस निघून जात आहे. त्यामुळे, प्रवाशांना उड्डाणपूल संरक्षण भिंतीवरून उड्या मारुन खाली उतरावे लागत आहे. यामुळे, दोन मोठे अपघात झाले असून, दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. महापालिका प्रशासनाकडून मुंबई ते पुणे महामार्गावर निगडी, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, निगडी गावठाण या ठिकाणी उड्डाणपुलावरून बाहेर निघण्यासाठी पर्यायी मार्गाची सोय नाही. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
---