तब्बल ४५ वर्षांनी भरली  
माजी विद्यार्थ्यांची शाळा

तब्बल ४५ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

सोमाटणे, ता. १ ः तब्बल पंचेचाळीस वर्षांनी पिंपळवंडी येथे माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती.
सन १९७८ मध्ये पिंपळवंडी येथील सुभाष विद्या मंदिरात शिक्षण घेतलेले व नोकरी व्यवसायानिमित्त मावळात स्थायिक झालेले विद्यार्थी
अशोक काकडे यांच्या पुढाकाराने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याची सुरवात गुरुजी के. एन. रोडे, ए. एल. भागवत, जी. डी. रोहकले, के. एस. काचळे, एस. टी. दिवटे, व्ही. पी. लोखंडे व एम. डी. वामन यांना वंदन करून करण्यात आली. मेळाव्यात अनेकांनी गुरुजीमुळे आपण कसे घडलो, याविषयी अनुभव सांगितले. साठी पार केलेले सर्वच विद्यार्थी आपले वय विसरून पुन्हा आपल्या बालपणाच्या आठवणीत रंगले होते. सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे व आपल्या जीवनातील खडतर प्रसंग अनेकांनी सादर केले. या विद्यार्थ्यांना आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके, मंगेश काकडे, संगीताताई वाघ, दिलीप गांजळे, संतोष खैरे, पोपट हाडवळे, रघुनाथ लेंडे आदींनी मार्गदर्शन केले. कुंडलिक काकडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक काकडे यांनी सूत्रसंचालन केले. रोहिदास वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन गणपत अभंग, कैलास गुंजाळ, अशोक ओव्हाळ, ज्ञानेश्वर रायकर, सुभाष सोनवणे यांनी केले.

-------------------------------
फोटोः २७८९९
--------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com