चिमणी दिनानिमित्त विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमणी दिनानिमित्त
विविध स्पर्धा
चिमणी दिनानिमित्त विविध स्पर्धा

चिमणी दिनानिमित्त विविध स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : जागतिक चिमणी दिनानिमित्ताने २० मार्चला अलाइव्ह संस्थेद्वारा चला चिऊ वाचवू अभियानांतर्गत विविध कला आणि साहित्य स्पर्धांचे आयोजन केले आहे.
संस्थेद्वारा चिऊ अभियानाचे हे आठवे वर्ष आहे. कागदावर स्वतः काढलेलं चिमणीचं चित्र तसेच, चिमणी कथामध्ये स्वानुभवावरील किंवा काल्पनिक स्वरचित चिमणीवरील कथा. कथेची कमाल शब्दमर्यादा ५०० असावी, चिमणीवर स्वरचित कविता असावी. स्पर्धेचा कालावधी १ ते १० मार्च २०२३ आहे. स्पर्धा सर्व वयोगटांसाठी विनामूल्य खुली आहे. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता. १९) होणार आहे.