Mon, March 27, 2023

विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटविना हाल
विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटविना हाल
Published on : 1 March 2023, 2:20 am
पिंपरी, ता. १ ः दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. मात्र शुल्क न भरल्यामुळे पिंपरीतील ज्युडसन हायस्कूलने ५ विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. कोरोनाच्या काळातील शुल्क माफ न करता दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षेचे कारण देत जुलमी वसुली करण्याचे कारस्थान शाळा प्रशासन करत आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी व पालकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. याबाबत शाळा समन्वयक संदीप मते म्हणाले, मुलांचे हाल होऊ नये, यासाठी हॉल तिकीट दिले आहेत.