
विज्ञान दिनानिमित्त तळेगावात कला प्रदर्शन
तळेगाव दाभाडे, ता. २ ः जैन इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विज्ञान आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि पोलिस निरिक्षक दुर्गानाथ साळी उपस्थित होते.
‘प्लास्टिकचा वापर टाळा निसर्ग वाचवा तरच विज्ञान टिकेल’ असा महत्त्वपूर्ण संदेश विजय सरनाईक यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिला. अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी स्वराज बागायतकर याने विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. चारशे विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. दिलीप पारेख, किरण परळीकर, दिलीप वाडेकर, राकेश ओसवाल, रिकबचंद गुंदेशा उपस्थित होते. विजया शिंदे, अपूर्वा टकले, शुभांगी भोईर यांचे सहकार्य लाभले. आभार कविता फाकटकर यांनी मानले.
तळेगाव दाभाडे ः जैन इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन पाहताना मान्यवर.