ज्येष्ठ नागरिक संघ इमारतीचे वडमुखवाडीत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक संघ इमारतीचे 
वडमुखवाडीत उद्‍घाटन
ज्येष्ठ नागरिक संघ इमारतीचे वडमुखवाडीत उद्‍घाटन

ज्येष्ठ नागरिक संघ इमारतीचे वडमुखवाडीत उद्‍घाटन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ, वडमुखवाडी चऱ्होली बुद्रुक येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीचे उद्‍घाटन गुरुवारी किसन लांडगे, माजी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ बागडे गुरुजी, माजी नगरसेवक दत्तात्रेय गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य भानुदास थोरात व कालिदास गेनू गिलबिले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांताराम बबनराव तापकीर, उपाध्यक्ष एकनाथ देवकर, आनंदराव साकोरे, बाळासाहेब तापकीर, दिनकर माळवे, दत्तात्रेय भाडळे, सतीश तापकीर, रतन इंगवले, शिवाजी तळेकर, सुरेश तापकीर व धोंगडे महाराज उपस्थित होते.