परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी 
विद्यार्थ्यांचे उपोषण
परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपोषण

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपोषण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या ८ मार्चला होणाऱ्या द्वितीय वर्षातील तिसरी सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी एक तारखेला विद्यार्थी बेमुदत उपोषणास बसले होते.
तिसऱ्या सत्रासाठीचा प्रवेश १६ डिसेंबर २०२२ ला झाला. तर, १४ जानेवारीला स्थानांतर केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली. ८ मार्चला परीक्षा घेण्यासाठी केवळ ७० दिवसही पूर्ण झाले नाहीत. मुलांना पाच विषयांचा अभ्यासक्रम आहे. यासाठी किमान ९० दिवसांचा कालावधी अभ्यासक्रमासाठी मिळणे अपेक्षित आहे. वेळापत्रकात पेपर एकापाठोपाठ ८ ते १३ मार्चपर्यंत दिलेले आहेत. एकही दिवसांचे अंतर पेपर दरम्यान दिलेले नाही. त्यामुळे, मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.