Wed, May 31, 2023

निकालाची उत्सुकता...
निकालाची उत्सुकता...
Published on : 2 March 2023, 2:47 am
थेरगाव : मतमोजणीला सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी केंद्राजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली. निकालाची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तत्काळ आकडेवारी समजण्यासाठी धडपड सुरू होती. भर उन्हातही कार्यकर्ते केंद्राजवळ थांबून होते. निकाल स्पष्ट होऊ लागताच आघाडीवर असलेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागला. निकालाच्या अपडेटबाबतची माहिती फोनवरून इतरांनाही दिली जात होती. फटाके फोडत, घोषणा देत आनंद साजरा केला. महिलांनी फुगड्याही खेळल्या. मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.