इंगळूण येथील श्रमसंस्कार शिबिरात राबविले विविध सामाजिक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंगळूण येथील श्रमसंस्कार शिबिरात
राबविले विविध सामाजिक उपक्रम
इंगळूण येथील श्रमसंस्कार शिबिरात राबविले विविध सामाजिक उपक्रम

इंगळूण येथील श्रमसंस्कार शिबिरात राबविले विविध सामाजिक उपक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत इंगळूण-पारिठेवाडी, तालुका मावळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. ‌‌
या शिबिरात विविध सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये मतदानाचे महत्त्व सांगणारे भिंत्ती चित्रे, ग्रामस्थांसाठी आ.भा.कार्ड काढून देणे, ग्राम स्वछता, शाळा डागडुजी, शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ, शिवकालीन युद्धकला प्रदर्शन, शेतीचे पाणी परीक्षण, सर्प : समज गैरसमज व तसेच विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, गटचर्चा, अंधश्रद्धा निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर, गिर्यारोहण या विविध उपक्रम घेतले. तसेच शाळेला आवश्यक असणारे संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराला उद्योजक नरेंद्र लांडगे, पीसीसीओइचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, जहाँगीर हॉस्पिटल, पुणे येथील डॉक्टर आणि इंगळूण पारिठेवाडीचे ग्रामस्थ यांनी भेटी देऊन विशेष कौतुक केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी इंगळूण पारिठेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, प्राध्यापक उपस्थित होते. शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी दिनेश कुटे, विद्यार्थी प्रतिनिधी सूरज घेवंदे यांनी केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठलराव काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता प्रवीण काळे, गोरख भालेकर, प्रा. केतन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले.