पिंपरीत एकावर चाकूने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत एकावर
चाकूने हल्ला
पिंपरीत एकावर चाकूने हल्ला

पिंपरीत एकावर चाकूने हल्ला

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : पुरूष भाडेकरू ठेवण्यास विरोध केल्याने चाकूने पोटात वार करीत एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना पिंपरी येथे घडली.
महादेव मरिप्पा म्हेत्रे (रा. गांधीनगर, पिंपरी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आक्का उर्फ राकेश काळूराम गोरखा (वय २७, रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी राकेश याने गणेश भांडेकर यांच्या खोलीकरिता पुरूष भाडेकरू आणला होता. दरम्यान, महादेव यांनी पुरूष भाडेकरूस विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने धमकी देत निघून गेला. त्यानंतर सायंकाळी पोटात चाकूने वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पळून गेला.

---------------------------