Fri, June 9, 2023

लग्नाचे आमिष दाखवून
तरुणीवर अत्याचार, फसवणूक
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, फसवणूक
Published on : 3 March 2023, 7:43 am
पिंपरी, ता. ३ : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. व्यवसायात अडचणी असल्याचे सांगत पैसे घेत आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल अशोकराव पिंपळे-देशमुख (वय ३३, रा. धानोरी, विश्रांतवाडी, मूळ- जालना) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने शादी डॉट या साईटवरून फिर्यादी यांच्याशी लग्नासाठी संपर्क केला. लग्नाचे आमिष दाखवले. व्यवसायात काही अडचणी आल्याचे दाखवून फिर्यादीला वेगवेगळ्या ॲपवरून कर्ज घेण्यास भाग पाडले. मिळालेले पैसे त्यांच्या मित्राच्या खात्यावर फोन पे व गुगल पे द्वारे ट्रान्स्फर करून घेतले. तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेत आर्थिक फसवणूक केली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर अत्याचार केला.