पिंपरी प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी प्रतिक्रिया
पिंपरी प्रतिक्रिया

पिंपरी प्रतिक्रिया

sakal_logo
By

प्रतिक्रिया
---------------
सर्वसामान्य जनता व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना विजय समर्पित करते. त्यांची अपुरी राहिलेली शास्ती माफी, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण अशी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार कधीच केला नव्हता. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला धन्यवाद देते.
- अश्विनी जगताप, नवनिर्वाचित आमदार, भाजप

महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांनी चांगला प्रचार केला. मतदारांनीही चांगले मतदान केले आहे. चिंचवडच्या जनतेने स्व. लक्ष्मण जगताप यांना विजयासाठी श्रद्धांजली वाहिली, हे निकालातून स्पष्ट झाले. भाजपने सत्तेचा गैरवापर करत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवले.
-विठ्ठल ऊर्फ नाना काटे, उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल, असे वाटले होते. पण, ती भावनेवर झाली. दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठेची केली. वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिला. ते वगळता मी एकाकी झुंज दिली. जनतेच्या पाठबळावर मी ही निवडणूक लढलो. परंतु, जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. यापुढेही मी जनतेची कामे करत राहणार आहे. भविष्यात मोर्चे बांधणीवर भर देणार आहे.
- राहुल कलाटे, उमेदवार, अपक्ष

महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दमदार विजय झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्या ३० वर्षांत शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून अश्विनीताईंच्या पाठीशी मतदार उभे राहिलेत. राज्य व केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांवर विश्वास ठेवला. प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
- महेश लांडगे, आमदार तथा शहराध्यक्ष

‘भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा केलेला वापर, सत्तेचा गैरवापर, पैशांचा महापूर निर्माण केल्यानंतरही त्यांना २०१९ च्या तुलनेत १५ हजार मते कमी पडली. तर विरोधातील मतांमध्ये ३० हजारांची वाढ झाल्याचे आजच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचा चिंचवडमध्ये नैतिकदृष्ट्या पराभवच झाला आहे. आमचे उमेदवार नाना काटे यांना मिळालेली मते लक्षणीय आहेत. त्यांची व बंडखोर उमेदवाराच्या मतांची बेरीज जगताप यांच्यापेक्षा अधिक होते.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेमापोटी जनतेने दिलेली ही विजयाची पावती आहे. भाजप व मित्रपक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा विजय आहे. चिंचवड मतदारसंघात व शहरात दिवंगत आमदार जगताप यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने व विकासकामे पूर्ण करण्यासाठी जगताप कुटुंबीय यापुढेही जनतेच्या सेवेत कार्यरत राहणार आहे.
- शंकर जगताप, भाजप, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख.