Thur, March 23, 2023

सिटीझन जर्नालिस्ट
सिटीझन जर्नालिस्ट
Published on : 3 March 2023, 10:39 am
लोकलसेवा पूर्ववत करा
पुणे ते लोणावळा सर्व लोकल उशिराने सोडतात. कामावर जायला रोज उशीर होतो. एक्सप्रेसला आधी ट्रॅक दिला जातो. शिवाजीनगरला लोकल थांबविल्याने पुण्याला जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. दुपारच्या बंद लोकल तर, चालू केल्याच नाहीत. उलट पुण्याला जाणाऱ्या ही लोकल बंद केल्या आहेत. कितीही एक्सप्रेस गाड्या सोडल्या तरी त्या प्रवाशांना लोकल लागणारच आहेत. हे रेल्वे प्रशासनाला समजायला हवे.
- एक वाचक, लोणावळा
--
विनापरवाना भंगाराची दुकाने
तहसीलदार कार्यालय आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गांवर पदपथ घाण करून, विना परवाने भंगाराची दुकाने उभी केली आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. त्वरित कारवाई करावी. अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
- एक नागरिक
फोटोः 28346