भागीदाराकडून कंपनीची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भागीदाराकडून कंपनीची फसवणूक
भागीदाराकडून कंपनीची फसवणूक

भागीदाराकडून कंपनीची फसवणूक

sakal_logo
By

भोसरीत भागीदाराकडून
कंपनीची फसवणूक

पिंपरी, ता. ३ : भागीदाराने कंपनीतील मालाचे बिल न बनवता खोटे हिशेब तयार करून मालाची परस्पर विक्री केली. यातून आलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा न करता वैयक्तिक खात्यावर जमा केली. लॅपटॉपमधील गोपनीय माहितीचा व ई-मेलचा वापर करून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी एमआयडीसी येथे घडला.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद ईश्वरचंद मित्तल (वय ४३, रा. पार्क स्ट्रीट, वाकड) व महिला आरोपी (वय ३७) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीची कंपनी वाढविण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीत भागिदारी करून कंपनीत डायरेक्टर असताना व त्यांच्या कंपनीतील कर्मचारी आरोपी महिलेशी संगनमत केले. कंपनीत तयार झालेल्या एक कोटी ७५ लाख चार हजार १०२ रुपये मटेरियलच्या चलनावर व कोटिंगकरीता आलेलया एक कोटी २८ लाख ४० हजार ३२९ रुपयांच्या मटेरियल चलनावरही आरोपींची सही आहे. असे एकूण तीन कोटी तीन लाख ४४ हजार ४३१ रुपयांचे बिल न बनवता त्यांचे खोटे हिशेब तयार करीत त्याची परस्पर कंपनीच्या ग्राहकांना विक्री केली. कोटिंगच्या ग्राहकांकडून आलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा न करता ती स्वतः वापरली. मित्तल यानी फिर्यादीच्या कंपनीचा गोपनीय माहिती असलेला लॅपटॉप व कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी त्यास दिलेल्या ई- मेलचा वापर करून फिर्यादीच्या कंपनीची फसवणूक केली.