बीजसोहळ्यानिमित्त देहूत हरिनाम सप्ताह सुरू

बीजसोहळ्यानिमित्त देहूत हरिनाम सप्ताह सुरू

देहू, ता. ३ ः जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या नऊ मार्चला होत आहे. या पार्श्वभूमीवर देहूतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात दोन हजार वारकरी गाथा पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हरिनाम घोषाने देहूनगरी दुमदुमत आहे.
संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. या सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बीज सोहळ्याला उपस्थित राहतात. गुरुवारी (ता. ९) मार्च बीज सोहळा आहे. संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने बिजेची जोरदार तयारी सुरू आहे. देऊळवाड्यात मंडप उभारणी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे ठिकठिकाणी देहूनगरी बीज सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळा सुरू झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या तीरावर राहुट्या तंबू उभारण्यात आले आहेत.
गाथा मंदिर येथे संत तुकाराम महाराज वाड्मय संशोधन मंडळ तथा गाथा मंदिराच्या वतीने १० मार्चपर्यंत गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ४) रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत संजय नाना धोंडगे यांचे कीर्तन होणार आहे. तर सायंकाळी सहा ते आठ यावेळेत माधव महाराज घुले यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी (ता. ५) गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे कीर्तन सायंकाळी सहा ते आठ यावेळेत होणार आहे. सोमवारी (ता. ५) स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी दोन वाजता ग्रंथ कंठपाठ बक्षिस वितरण गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. कान्होबा महाराज देहूकर याच्या सायंकाळी कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (ता. ७) ज्ञानेश्वर महाराज शिंदे आणि बुधवारी (ता. ८) चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (ता. ९) बीज सोहळ्यानिमित्त पांडुरंग महाराज घुले यांचे सकाळी दहा ते बारा यावेळेत कीर्तन होणार आहे. सायंकाळी सहा ते आठ यावेळेत रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी (ता. १०) बंडातात्या कराडकर यांचे सकाळी नऊ ते अकरा यावेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.

देहू ः संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी राहुट्या आणि तंबू उभारून गाथा पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. नांदेड येथील एका दिंडीने आमराईत निवाऱ्यासाठी तंबू उभारले आहेत.


(डीयूएच3पी1103,1104)
देहू ः गाथा मंदिराच्या आवारात गाथा पारायण सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com