शिवजयंतीनिमित्त आज ‘चिखली मॅरेथॉन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीनिमित्त
आज ‘चिखली मॅरेथॉन’
शिवजयंतीनिमित्त आज ‘चिखली मॅरेथॉन’

शिवजयंतीनिमित्त आज ‘चिखली मॅरेथॉन’

sakal_logo
By

पिंपरी, ता.४ ः श्री क्षेत्र टाळगाव चिखली शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती १० मार्च रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने रविवारी (ता. ५)सकाळी सहा वाजता चिखली मॅरेथॉनचे (रन फॉर युनिटी) आयोजन केले आहे. यामध्ये लहान मुले, पुरुष व महिला असे दोन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत.
मंगळवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजता अभिषेक स्पोर्ट्स क्लब चिंचवड आयोजित रोप मल्लखांब तर कोब्रा मार्शल आर्ट्स यांची साहसी प्रात्यक्षिके तर विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्यावतीने योग वंदना प्रात्यक्षिके होणार आहेत. बुधवारी (ता. ८) सायंकाळी सात वाजता महिलांसाठी होममिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. गुरुवारी (ता. ९)सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर असून, रात्री आठ वाजता निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी आठ वाजता किल्ले शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन होऊन गावातील महिला शिवजन्मोत्सव साजरा करणार आहेत. सायंकाळी सात वाजता दादामहाराज गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थी शिवजन्मावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी चार ते दहा या वेळात पवारवस्ती ते चिखली मुख्य चौक अशी भव्य पारंपरिक शिवजयंती मिरवणूक होणार आहे.