एमआयटीतर्फे दोन दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

एमआयटीतर्फे दोन दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

एमआयटीतर्फे दोन दिवसीय
विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

पिंपरी, ता.४ ः आळंदी येथील ‘एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष व व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभाग यांच्यावतीने दोन दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा घेतली. त्यात ‘देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात उद्योजकता विकासासाठी असलेल्या सरकारी योजना’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत पुणे व पुणे शहराबाहेरील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत नवोदित उद्योजकांसाठी योजना आणि साह्य या विषयावर सुरेश उमाप, विभागीय प्रमुख, (एमसीईडी) पुणे. डॉ. विशाल घाग, संचालक, स्लिकून बिझनेस स्कूल, लंडन आणि संस्थापक प्रतिभाशाला फाऊंडेशन यांनी ‘सूक्ष्म वित्तपुरवठा योजना’ यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, ‘सध्याच्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये व्यवसाय विकासाच्या संधी’ या विषयावर श्रद्धा एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक हेमंत भागवत यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात उद्योजिका प्रमिला भीमपुरे, संचालक, ग्रॅम्पस शिपिंग अँड लॉजिस्टिक यांनी ‘पुरवठा व पुरवठा साखळी आणि आयात निर्यात’ या मधील संधी यावर विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी लहान स्टार्ट अप्सपासून व्यवसायांच्या यशस्वी ऑपरेशन्सपर्यंत विविध व्यवसायांच्या अनेक गोष्टी शिकल्या. प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी बीबीए विभागाचे प्रमुख व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मंगेश भोपळे, समन्वयक प्रा. आकांक्षा लांडगे, डॉ. अमोल माने, डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. शरद कदम, डॉ. रितूजा देशपांडे, हनुमंत शिंगाडे, प्रा. निर्मल बाबू आदींनी कष्ट घेतले.
फोटोः 28637

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com